सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी या पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज सादर करणेबाबत
या संस्थेतील सर्व विदयार्थ्यांना कळविण्यात येते की, जे विदयार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र आहेत. अशा सर्व विदयार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर (http://Mahadbtmahait.gov.in) या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शिष्यवृत्ती अर्ज शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी भरावयाचे आहेत. विदयार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरणे तसेच शिष्यवृत्ती अर्ज नुतनीकरण करणे दि. २१/०९/२०२२ पासुन सुरु झाले आहे. ज्या विदयार्थ्यांनी अदयाप शिष्यवृत्ती अर्ज भरले नाहीत त्यांनी लवकरात लवकर शिष्यवृत्ती अर्ज भरावेत. याची सर्व विदयार्थ्यांनी नोंद घ्यावी. जे विद्यार्थी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरणार नाहीत अशा विदयार्थ्यांना संस्थेची पुर्ण फी भरावी लागेल व त्यास स्वतः विदयार्थी जबाबदार राहील याची सर्व संबंधित विदयार्थ्यांनी नोंद घ्यावी.
अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर प्रत्येक आठवडयातून कमीत कमी एकदा आपल्या अर्जाची स्थिती तपासावी व अर्जामध्ये काही त्रुटी दिलेली असल्यास ती दूर करून अर्ज पुनश्च ऑनलाईन सादर करावा. अर्ज जो पर्यंत विभागाव्दारे मंजूर होत नाही. तो पर्यंत आपल्या अर्जाची स्थिती विदयार्थ्यांनी आपले लॉगीन मध्ये ऑनलाईन पध्दतीने वेळोवेळी (आठवडयातून दोनदा) तपासणे आवश्यक आहे.
pdf पाहण्यासाठी येथे क्लीक करा