Skip to content
( 02164 ) – 271462
gpkarad.dte@gmail.com
DTE Code : 6016
MSBTE Code : 0010

Government Polytechnic Karad

( शासकीय तंत्रनिकेतन, कराड ) 

अभ्यागत अधिव्याख्याता नेमणूकीकरिता थेट मुलाखत ( Walk in Interview) 2026-2027

Start Date : 

July 4, 2026

End Date :

July 10, 2026

अभ्यागत अधिव्याख्याता नेमणूकीकरिता थेट मुलाखत  ( Walk in Interview)

शासकीय तंत्रनिकेतन, कराड  या संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ विषम सत्राकरिता निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर अभ्यासक्रम शिकविण्यासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यात्यांची आवश्यकता आहे. अभ्यागत अधिव्याख्यात्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

विभाग / विषय शैक्षणिक अर्हता आणि पात्रता मुलाखतीचा वेळ व दिनांक
स्थापत्य, अणुविद्युत   व दूरसंचार अभियांत्रिकी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या प्रचलित नियमावली प्रमाणे संबधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी (प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर पदवीस्तरावर आवश्यक) दिनांक ०९/०७/२०२६  वेळ सकाळी १०.०० वाजता
गणित, इंग्रजी,  भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र, योगा शास्त्र. प्रथम श्रेणीतील पदव्युत्तर पदवी
विद्युत , संगणक, यंत्र, मेकॅट्रॉनिक्स व उपकरणीकरण अभियांत्रिकी, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या प्रचलित नियमावली प्रमाणे संबधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी (प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर पदवीस्तरावर आवश्यक) दिनांक १०/०७/२०२६  वेळ सकाळी १०.०० वाजता

 

तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी Bio-data, मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतीसह स्वखर्चाने वरील प्रमाणे संस्थेत उपस्थित राहावे. प्रत्येक विभागातील शैक्षणिक कार्यभारानुसार आवश्यक असलेल्या अभ्यागत अधिव्याख्यात्यांची निवड शासनाच्या विहित  प्रक्रियेनुसार करण्यात येईल. अभ्यागत अधिव्याख्यात्यांना घेण्यात आलेल्या तासिका प्रमाणे शैक्षणिक कार्यभाराचे मानधन शासन निर्णयानुसार देय राहील.

इच्छुक पात्र उमेदवारांनी https://forms.gle/xGKMMZMKF3Pg66wk8  या Google Form मध्ये माहिती भरावी.

टीप – १. सदर जाहिरात ही निव्वळ तासिका तत्वावर असल्यामुळे भविष्यात सदरील जागेवर कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही तसेच नियमित नियुक्तीचा कुठलाही दावा करता येणार नाही.

२. उमेदवारांना विहित नमुन्यातील अटी व शर्ती मान्यतेचे हमीपत्र देण्याच्या अधीन राहूनच नियुक्ती देण्यात येईल.

३. सदरच्या नियुक्त्या मा. संचालक, तंत्रशिक्षण यांच्या पत्र क्र. ४अ/आस्था -२/तासिका तत्वावर/२०२५/ ५०६ दि.११/१२/२०२५ रोजीच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निकष व अटींना  अनुसरून असतील.

Translate »
Skip to content